बेळगाव उत्तरचे आमदार आसीफ सेठ यांनी राणी चन्नम्मा चौकात सुरू असलेल्या २४ तास पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईन कामाची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याचे कडक निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

राणी चन्नम्मा चौकात ६०० एमएम व्यासाची मुख्य पाणी वितरण वाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. या वाहिनीमुळे वॉर्ड क्रमांक १ ते १० मधील सुमारे एक लाख नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.

पाहणीदरम्यान आमदार आसीफ सेठ यांनी कामाच्या ठिकाणी योग्य वाहतूक नियोजन आणि सुरक्षा उपायांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले. सार्वजनिक वाहतुकीला कमीत कमी अडथळा येईल अशा पद्धतीने काम वेगाने पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले.
Belagavi
आमदार आसीफ सेठ यांच्याकडून २४ तास पाणीपुरवठा कामाची पाहणी


Recent Comments