Belagavi

बेळगावच्या माहेश्वरी अंध शाळेत विज्ञान प्रयोगशाळेचे उद्घाटन

Share

बेळगाव येथील माहेश्वरी अंध मुलांच्या शाळेत बेंगळुरूची ‘व्हिजन एम्पॉवर’ संस्था आणि ‘बास्ट’ कंपनीच्या संयुक्त विद्यमाने नव्याने उभारण्यात आलेल्या विज्ञान प्रयोगशाळेचे थाटात लोकार्पण करण्यात आले.

१ ऑक्टोबर रोजी बेळगाव जिल्हा अंध सेवा संस्थेच्या माहेश्वरी अंध मुलांच्या शाळेत हा उद्घाटन सोहळा पार पडला. बी. के. मॉडेल सायन्स कॉलेजचे प्राचार्य श्रीधर हुक्केरी हे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या अन्य प्रमुख पाहुण्या व्हिजन एम्पॉवरच्या राज्य समन्वयक श्रेया नेल्लीसर यांनी या प्रयोगशाळेचे कौतुक करत विज्ञान हे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात अत्यंत उपयुक्त आणि महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन केले.

यावेळी नाग रत्ना राजेश्वरी, राजेश, बसलिंगम्मा चौगुला, चिंतामणी ग्रामोपाध्ये, श्रीनिवास शिवणगी, कांतेश आचार्य, आनंद जोशी, कीर्ती राजपूत, अमित, ईरण्णा यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: