Belagavi

संत मीरा शाळेच्या समर्थ बेकवाडकरची राज्य स्पर्धेसाठी निवड

Share

नेहरूनगर येथील जिल्हा क्रीडांगणावर जिल्हा पंचायत व सार्वजनिक शिक्षण खात्याच्या प्राथमिक व माध्यमिक मुलां-मुलींच्या जिल्हा स्तरीय अॅथलेटिक स्पर्धेत अनगोळ येथील संत मीरा शाळेच्या समर्थ बेकवाडकरने सुवर्णपदक पटकावित राज्य स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.

जिल्हा पातळीवरील 14 वर्षांखालील मुलाच्या गटामध्ये
80 मीटर अडथळा शर्यतीत समर्थ बेकवाडकरने 15.31 सेकद इतका अवधी घेत सुवर्णपदक पटकाविले मराठी शाळा खादरवाडी शाळेचा खेळाडू ध्रुव हालगेकरने 15.56 इतका अवधी घेत रौप्यपदक पटकाविले. तर देसूर शाळेच्या मयुरेश अवकाळे यांनी 16.01 इतका अवधी घेत कास्यपदक पटकाविले.
आता सार्वजनिक शिक्षण खात्याच्या राज्य पातळीवरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
प्रमुख पाहुणे जिल्हा शारीरिक शिक्षण अधिकारी जुनेद पटेल पीईओ जहिदा पटेल यांच्या हस्ते समर्थ बेकवाडकरचा सत्कार करण्यात आला.
समर्थ ला शाळेचे क्रीडाशिक्षक चंद्रकांत पाटील शिवकुमार सुतार, अनुराधा पुरी यांचे मार्गदर्शन ते संस्थेचे अध्यक्ष परमेश्वर हेगडे प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी मुख्याध्यापक सुजाता दप्तरदार, उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव यांचे प्रोत्साहन लाभत आहे.

बेळगांव प्रमुख पाहुणे जुनेद पटेल,जाहिदा पटेल, पदक व प्रमाणपत्र देऊन समर्थ याचा सत्कार करताना शेजारी शिक्षक वर्ग.

Tags: