Belagavi

यमकनमर्डीमध्ये समर्थकांकडून राहुल जारकीहोळी यांचा वाढदिवस साजरा

Share

यमकनमर्डी मतदारसंघात बीडीसीसी बँकेचे संचालक आणि काँग्रेसचे युवा नेते राहुल जारकीहोळी यांचा वाढदिवस समर्थकांनी मोठ्या उत्साहात साजरा केला.

अलदाळ विश्रामगृहाच्या आवारात पार पडलेल्या या कार्यक्रमात विविध मठाधीशांच्या उपस्थितीत राहुल जारकीहोळी यांचा सत्कार करून त्यांना आशीर्वाद देण्यात आले.

यानंतर उपस्थितांना केकचे वाटप करण्यात आले असून हजारो समर्थकांनी पुष्पगुच्छ देऊन राहुल जारकीहोळी यांना शुभेच्छा दिल्या.

वडील सतीश जारकीहोळी यांच्या मार्गदर्शनाखाली गरीब, शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेची सेवा करत असून नागरिकांचे असेच सहकार्य लाभत राहो, असे मत राहुल जारकीहोळी यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाला माजी मंत्री वीरकुमार पाटील यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक उपस्थित होते.

Tags: