Bellary

बळ्ळारीमध्ये कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

Share

बळ्ळारी जिल्ह्यातील सिरगुप्पा तालुक्यातील चाणकनूर येथे कर्जाच्या बोज्याला कंटाळून एका शेतकऱ्याने शेतातच विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

सिरगुप्पा तालुक्यातील चाणकनूर येथील ३५ वर्षीय नागराज या शेतकऱ्याने आर्थिक विवंचनेतून शेतात विष प्राशन करून आपले जीवन संपवले.

खरीप हंगामात घेतलेले कापसाचे पीक पावसाअभावी वाया गेले होते, तर त्यानंतर कर्ज काढून घेतलेले ज्वारीचे पीकही हातातून गेले. यामुळे त्यांच्यावर सेवा सहकारी संस्था आणि इतर माध्यमातून लाखो रुपयांचे कर्ज साचले होते.

पीक हातात न आल्याने आणि कर्ज फेडणे शक्य नसल्याने खचलेल्या नागराज यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. याप्रकरणी सिरगुप्पा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags: