मतदार यादी पुनरीक्षणादरम्यान ‘फॉर्म ७’ अंतर्गत हरकती नोंदवण्याच्या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार आणि दडपशाहीचे राजकारण सुरू असल्याचा आरोप भाजप प्रदेश उपाध्यक्ष व माजी आमदार अनिल बेनके यांनी केला आहे.

बेळगावात पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, नियमानुसार बीएलए-२ च्या स्वाक्षऱ्या घेऊन अर्ज सादर करण्यात आले होते. मात्र, वीरभद्रनगर येथील बूथवर हरकती नोंदवण्यासाठी गेलेल्या कार्यकर्त्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला असून अर्जांवर कारवाई करू नये म्हणून बीएलओंवर दबाव आणला गेला.

बांगलादेशी आणि रोहिंग्यांसारख्या बेकायदेशीर स्थलांतरितांची नावे मतदार यादीत समाविष्ट असताना ती हटवणे चुकीचे आहे का, असा सवाल त्यांनी केला. तसेच बेळगाव उत्तर मतदारसंघात ७० ते ८० टक्के बीएलओ एकाच विशिष्ट समुदायाचे असण्यावर त्यांनी संशय व्यक्त केला.
काँग्रेस आमदार आसिफ सेठ यांच्या मुलाने अधिकृत पद नसताना मुख्यमंत्र्यांकडे कागदपत्रे सोपवून दिशाभूल केली आहे. प्रशासनाने रोहिंग्यांवर नेमकी काय कारवाई केली याचे उत्तर सरकारने द्यावे, अशी मागणी करत बेनके यांनी काँग्रेसवर बेकायदेशीर कृत्यांना खतपाणी घालण्याचा आरोप केला.


Recent Comments