Chikkodi

चिकोडी पालिकेत उपलोकायुक्तांची धाड

Share

चिकोडी नगरपालिकेला उपलोकायुक्त न्यायमूर्ती बी. वीरप्पा यांनी अचानक भेट देऊन अधिकाऱ्यांच्या फोनपे खात्यांची कसून तपासणी केली.

अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतनाव्यतिरिक्त खात्यावर येणाऱ्या रकमेबाबत उपलोकायुक्तांनी संशय व्यक्त केला. त्यांनी स्वतः अधिकाऱ्यांचे मोबाईल घेऊन फोनपे व्यवहारांची पाहणी केली.

खात्यांवर एक लाख रुपयांहून अधिक रकमेचे संशयास्पद व्यवहार आढळल्याने बी. वीरप्पा यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. एका अधिकाऱ्याने मुलीने पैसे पाठवल्याचा दावा केला. मात्र, अन्य अधिकाऱ्यांच्या खात्यावरही मोठी रक्कम जमा झाल्याचे दिसून आले.

या प्रकारामुळे संतप्त झालेल्या उपलोकायुक्तांनी कर्मचाऱ्यांना खडे बोल सुनावले. तसेच गेल्या दोन वर्षांतील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनाची संपूर्ण माहिती तातडीने सादर करण्याचे आदेश दिले.
उपलोकायुक्तांच्या या धडक कारवाईमुळे चिकोडी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Tags: