Chikkodi

चिकोडीतील बसवेश्वर चौकात सांडपाण्याचे साम्राज्य

Share

चिकोडी येथील बसवेश्वर चौकात मुख्य रस्त्यावरच सांडपाणी वाहात असल्याने परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

नगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे आणि अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे बसवेश्वर चौकातील गटारांची व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. रस्त्यावर सांडपाणी साचल्याने संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली आहे.

पाऊस पडल्यानंतर परिस्थिती अधिकच बिघडत असून रस्त्यावरून वाहणाऱ्या गलिच्छ पाण्यातूनच वाहनधारक आणि पादचाऱ्यांना प्रवास करावा लागत आहे. दुर्गंधीमुळे परिसरात साथीचे आजार पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

या समस्येबाबत नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना वारंवार सांगूनही त्यांनी याकडे दुर्लक्ष केले असल्याचे स्थानिक व्यापाऱ्यांनी सांगितले.

नगरपालिका प्रशासनाने या समस्येकडे तत्काळ लक्ष देऊन गटारांची स्वच्छता करावी आणि कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी केली जात आहे.

Tags: