Chikkodi

चिक्कोडीत हेस्कॉम कार्यालयासमोर संतप्त ग्रामस्थांचे महाप्रसाद आंदोलन!

Share

चिक्कोडी तालुक्यातील उमरणी आणि बेळगळी परिसरात वारंवार होणाऱ्या खंडित वीजपुरवठ्यामुळे त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी गुरुवारी नागरमुन्नोळी येथील हेस्कॉम (KEB) कार्यालयासमोर महाप्रसादाचा आस्वाद घेत सरकार आणि प्रशासनाविरोधात अनोखे आंदोलन छेडले.

गणेशोत्सवानिमित्त तयार करण्यात आलेल्या महाप्रसादाचा अंधारामुळे घरी आस्वाद घेणे शक्य नसल्याने संतप्त भक्तांनी तो थेट केईबी कार्यालयाच्या आवारात आणला आणि तेथेच सर्वांनी प्रसादाचा आस्वाद घेऊन अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणाचा तीव्र निषेध नोंदवला.

याप्रसंगी बोलताना वकील प्रशांत हुक्केरी यांनी ग्रामीण भागातील सततच्या वीज समस्येवरून सरकार आणि हेस्कॉम अधिकाऱ्यांवर जोरदार ताशेरे ओढले. “सण-उत्सवाच्या दिवसांतही नागरिकांना अंधारात राहावे लागत असेल, तर हे प्रशासनाचे मोठे अपयश आहे,” असे सांगत त्यांनी वीजपुरवठा तातडीने पूर्ववत न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.

नागरमुन्नोळी ग्रामस्थांच्या या अनोख्या आंदोलनाचे व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाले असून या आंदोलनाची चर्चा मात्र दिवसभर रंगली होती.

Tags: