महिलांना कामाच्या ठिकाणी सुरक्षित आणि सन्मानजनक वातावरण मिळणे ही सर्वांची जबाबदारी असून, पीडित महिलांनी न घाबरता हेल्पलाईन अथवा आयोगाशी संपर्क साधावा, असे प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा नागलक्ष्मी चौधरी यांनी केले.


सुवर्णसौधच्या सेंट्रल हॉलमध्ये महिलांवरील लैंगिक छळ प्रतिबंधक कायदा २०१३ (POSH) संदर्भात जिल्हास्तरीय कार्यशाळा पार पडली. यावेळी अध्यक्षा नागलक्ष्मी चौधरी यांनी महिलांच्या रक्षणासाठी १८1, ११२ या हेल्पलाईन आणि व्हॉट्सॲप सुविधांची माहिती देत, तक्रारींचे निवारण करण्यासाठी आयोग सदैव कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले.


कार्यक्रमप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक प्रशांत तुरमुरी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, कामाच्या ठिकाणी महिलांचा छळ रोखणे हा पॉश कायद्याचा मुख्य उद्देश आहे. १० किंवा त्याहून अधिक कर्मचारी असलेल्या प्रत्येक संस्थेत अंतर्गत तक्रार समिती (ICC) स्थापन करणे कायद्याने बंधनकारक आहे.
असंघटित क्षेत्र आणि रोजंदारी कामगार महिलांपर्यंत या कायदेशीर संरक्षणाची माहिती पोहोचवणे गरजेचे असल्याचे सांगत, सुरक्षित कार्यस्थळासाठी सर्व घटकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. या कार्यशाळेला महिला आयोगाच्या सचिव रूपा आर. यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


Recent Comments