बेळगाव येथील सदाशिव नगर येथील गौरी महिला मंडळाच्या वतीने स्थानिक सदाशिव मंदिरात श्री कृष्ण जन्माष्टमी व महालक्ष्मी पूजन सोहळा उत्साहात पार पडला.


या कार्यक्रमाप्रसंगी बाळकृष्णाचा पाळणा, महालक्ष्मी पूजन, महाआरती तसेच महिलांसाठी सामूहिक हळदी-कुंकू आणि ओटी भरण्याचा धार्मिक कार्यक्रम पारंपरिक पद्धतीने पार पडला. मंडळाच्या सर्व सदस्या पारंपरिक पोशाखात पूजेला उपस्थित होत्या.

कार्यक्रमात शहरातील प्रसिद्ध ‘चंदू काका ज्वेलर्स’च्या पथकाने विशेष अतिथी म्हणून हजेरी लावली. महिलांसाठी विविध खेळ आयोजित करून विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. तसेच उपस्थितांसाठी अल्पोपाहाराची व्यवस्था करण्यात आली होती.
यावेळी गौरी महिला मंडळाच्या पदाधिकारी, सदस्या आणि परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


Recent Comments