बेळगावच्या हुतात्मा चौक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने अशोक पोतदार यांच्या हस्ते मुहूर्तमेढ रोवून आगामी उत्सवाची सुरुवात करण्यात आली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मंडळाचे प्रेरणास्थान दिवंगत रामकुमार जोशी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आणि त्यानंतर अहवाल प्रकाशित करण्यात आला. या प्रसंगी बोलताना अशोक पोतदार यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाचा उत्सवही सर्वांच्या सहभागाने शिस्तबद्ध आणि धार्मिक वातावरणात यशस्वी केला जाईल असा विश्वास व्यक्त केला.

या कार्यक्रमाला मंडळाचे श्याम सुतार, शेखर हांडे, राजकुमार कळघटगी, महेंद्र पोरावाल, लक्ष्मीकांत जाधव, विजय मोहिते, संजय चौगुले, अमोल बेद्रे, दिलीप पाटील, अशोक नायक, अशोक कलबुर्गी, चंदू कोलकार, यश हांडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन शिवाजीराव हांडे यांनी केले.


Recent Comments