Belagavi

केएलई रुग्णालयात पाणीटंचाईमुळे रुग्णांचे हाल

Share

बेळगाव येथील केएलई डॉ प्रभाकर कोरे रुग्णालयात उद्भवलेल्या पाणीटंचाईमुळे रुग्णांचे मोठे हाल होत असून एल अँड टी कंपनीने रुग्णालयाला पाणीपुरवठा करण्यासाठी प्रथम प्राधान्य दिले पाहिजे असे प्रतिपादन केएलई रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ कर्नल एम दयानंद यांनी केले आहे

केएलई रुग्णालयाला दररोज १० लाख लिटर पाण्याची गरज असते. येथे हजारो रुग्ण उपचारासाठी दाखल असून त्यांना पाण्याची नितांत गरज आहे. डायलिसिस आणि बाळंतपणाच्या विभागातील रुग्णांसाठी पाणी अत्यंत आवश्यक आहे. बेळगाव शहरातील नागरिकांना पाणी पुरवणे हे आपले पहिले प्राधान्य असल्याचे एल अँड टी कंपनी सांगत आहे. परंतु रुग्णालयातील रुग्णांची स्थिती लक्षात घेऊन एल अँड टी कंपनीने केएलई रुग्णालयाला पाणी देण्यास प्रथम प्राधान्य दिले पाहिजे असे डॉ कर्नल एम दयानंद यांनी म्हटले.

बेळगावच्या केएलई डॉ प्रभाकर कोरे रुग्णालयात शेजारील महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांतूनही मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येतात. एल अँड टी कंपनीच्या दुर्लक्षामुळे गेल्या दोन दिवसांपासून ही पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. यासंदर्भात म्हैसूर आणि बेळगाव येथील कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधूनही प्रश्न सुटलेला नाही अशी माहिती डॉ कर्नल एम दयानंद यांनी दिली.

Tags: