Belagavi

प्रभावती हालेन्नवर यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट शिक्षिका पुरस्कार

Share

बेळगाव ग्रामीण क्षेत्रातील शिक्षण क्षेत्राच्या वैभवात मोलाची भर पडली असून जाफरवाडी कडोली शाळेच्या मुख्याध्यापिका प्रभावती हालेन्नवर यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे.

बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील बेळगाव ग्रामीण विभागातील जाफरवाडी कडोली मराठी वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका प्रभावती बाळप्पा हालेन्नवर यांची शैक्षणिक सेवेतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड झाली आहे. त्यांनी शिक्षण क्षेत्रात दिलेल्या योगदानाची दखल घेऊन हा सन्मान जाहीर करण्यात आला असून, संपूर्ण बेळगाव जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Tags: