Belagavi

देशपांडे इंडस्ट्रीजच्या नव्या कारखाना व कार्यालयाचे उद्घाटन

Share

बेळगाव येथील उद्यमबाग बीईएमसीआयएल औद्योगिक वसाहतीत देशपांडे इंडस्ट्रीजच्या नवीन कारखाना व कार्यालय इमारतीचा वास्तूशांती आणि उद्घाटन सोहळा संपन्न झाला. पाच दशकांचा इतिहास असलेल्या या संस्थेच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन आमदार आणि इतर मान्यवरांच्या हस्ते झाले.

बेळगाव दक्षिण मतदारसंघाचे आमदार अभय पाटील आणि प्रीती पाटील यांच्या हस्ते या नव्या कारखाना व कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या सोहळ्याला उद्योजक आणि चित्रपट निर्माते श्रीकांत देसाई, ग्रीव्हज कॉटन लिमिटेडचे जीएम विजय छत्तानी तसेच एजीएम नरसिंहराव कुलकर्णी उपस्थित होते.

नवीन कार्यालयाचे उद्घाटन केल्यानंतर आमदार अभय पाटील यांनी संस्थाचालक भरत देशपांडे आणि त्यांच्या कुटुंबाचे अभिनंदन केले. या नव्या वास्तूच्या माध्यमातून व्यवसायाचा विस्तार व्हावा आणि भरत देशपांडे तसेच त्यांची कन्या श्रिया यांनी लोकांच्या सेवाकार्यात निरंतर योगदान द्यावे, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.

ग्रीव्हज कॉटन लिमिटेडचे विभागीय प्रमुख विजय छत्तानी यांनी देशपांडे इंडस्ट्रीज गेल्या ५० वर्षांहून अधिक काळापासून जनरेटर विक्री व सेवेत उत्तम काम करत असल्याचे सांगून शुभेच्छा दिल्या. तसेच भरत देशपांडे यांचे बंधू श्रीकांत देशपांडे यांनी श्रिया देशपांडे या व्यवसायाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळत असल्याचे नमूद केले.

श्रिया भरत देशपांडे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितेल की, आजोबा कुसुम देशपांडे आणि देवराज देशपांडे यांनी स्थापन केलेल्या या संस्थेला ५० वर्षे पूर्ण होणे हा भावूक क्षण आहे. तीन दशकांपासून पाठशी असलेल्या कर्मचाऱ्यांचे आणि ग्राहकांचे आभार मानत पुढील ५० वर्षेही अशीच उत्कृष्ट सेवा देण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Tags: