Chikkodi

चिक्कोडीत परटी नागलिंगेश्वर यात्रेनिमित्त रंगल्या चित्तथरारक कुस्त्या

Share

चिक्कोडी येथील प्रसिद्ध परटी नागलिंगेश्वर यात्रेनिमित्त भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा भागातील नामवंत मल्लांनी भाग घेतला.

परटी नागलिंगेश्वर आखाड्यात एकूण ५५ जोडी पैलवानांमध्ये अटीतटीच्या कुस्त्या रंगल्या. पैलवानांचे कौशल्याने भरलेले डावपेच पाहण्यासाठी कुस्ती शौकिनांनी मोठी गर्दी केली होती.

यात्रेनिमित्त परटी नागलिंगेश्वर देवाला विशेष पूजा, महाप्रसाद आणि पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याशिवाय विद्यार्थ्यांसाठी व्हॉलीबॉल स्पर्धा पार पडली.

स्पर्धेत सहभागी मल्लांना रोख पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. लोप पावत चाललेल्या पारंपारिक देशी खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम दरवर्षी राबवला जातो.

कुस्ती खेळाचे जतन करण्यासाठी आणि युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी या कुस्ती मैदानाचे यशस्वी आयोजन केले जाते असे प्रकाश मुचंडी यांनी म्हटले. या प्रसंगी सतीश घोरपडे, अनिल माने, अजय कवटगीमठ, भरत जुगूळे, बाळू माने, रमेश चन्नवर, संजय भोसले, बसवराज मुसुंडी आणि दिलीप संमतशेट्टी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Tags: