Belagavi

जैन अभियांत्रिकी महाविद्यालयात INCECT-2026 आंतरराष्ट्रीय परिषदेला प्रारंभ

Share

जैन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये दोन दिवसीय INCECT-2026 आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन झाले. इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागाने IEEE बंगळुरू विभाग, NKSS आणि AESS बंगळुरू यांच्या तांत्रिक सहकार्याने ही परिषद संकरित पद्धतीने आयोजित केली आहे.

जैन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. जे. शिवकुमार यांनी स्वागत केले. व्हीटीयू बेळगावचे नोंदणी अधिकारी डॉ. प्रसाद रामपुरे यांनी संशोधन प्रकाशने, पेटंट तसेच विद्यार्थी आणि प्राध्यापकांकडून उत्पादन निर्मितीच्या महत्त्वावर भर दिला. थायलंडच्या डॉ. नरुमोल चुमुआंग यांनी नावीन्य ही सीमा ओलांडणारी सार्वत्रिक भाषा असल्याचे सांगितले.

परिषदेच्या अध्यक्षा डॉ. कृपा रासणे यांनी परिषदेत १२ देशांतून ४,३५६ संशोधन निबंध सादर झाल्याची माहिती दिली. त्यापैकी २९२ निबंध स्वीकारण्यात आले असून १९२ जणांनी परिषदेसाठी नोंदणी केली आहे.

डॉ. पी. व्ही. गोपीकृष्ण यांनी प्रमुख पाहुण्यांचा, तर डॉ. जे. एम. रुदागी यांनी सन्माननीय पाहुण्यांचा परिचय करून दिला. ईसीई विभागप्रमुख आणि परिषदेचे समन्वयक प्रा. व्ही. आर. बगळे यांनी आभार मानले.

Tags: