दुष्काळ निवारण आणि पीक नुकसानीबाबत सर्व पालकमंत्र्यांनी अहवाल दिला असून, केंद्रीय पथकाच्या पाहणीनंतर राज्यात अधिकृतपणे दुष्काळ जाहीर केला जाईल, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले.

बंगळुरूत पत्रकारांशी बोलताना मंत्री सतीश जारकीहोळी यांनी पक्षाच्या हितासाठी सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आणि जबाबदारीचे असल्याचे सांगितले. राज्य काँग्रेस सरकारमधील मंत्रिमंडळ स्थापनेच्या वेळी निर्माण झालेली नाराजी दूर करून पक्ष पूर्ववत करण्यासाठी वरिष्ठ नेते पुढे सरसावले आहेत. “अहिंद म्हणजेच काँग्रेस आणि काँग्रेस म्हणजेच अहिंद,” असे मत त्यांनी मांडले. तसेच माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील अहिंद मेळाव्यात वेळेनुसार सहभागी होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. माजी मंत्री बी. नागेंद्र यांच्याविषयी बोलताना, लोकायुक्तांनी दिलेल्या क्लीन चिटच्या आधारेच त्यांना मंत्रिपद देण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तसेच जिल्हा पालकमंत्र्यांनी पीक पाहणी अहवाल सादर केला असून, केंद्रीय पथकाच्या भेटीनंतर राज्य सरकारकडून दुष्काळाची अधिकृत घोषणा केली जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली.


Recent Comments