बेळगाव येथील आनंदवाडीच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरासमोर अंडरग्राउंड ड्रेनेज ब्लॉक झाल्याने सांडपाणी रस्त्यावर येऊन साचले होते. यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची व स्थानिक रहिवाशांची मोठी गैरसोय होत होती.


या समस्येबाबत नागरिकांनी तक्रार करताच स्थानिक नगरसेवक नितीन जाधव यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर लगेचच जेसीबी व कामगारांच्या मदतीने ड्रेनेजचा अडथळा दूर करून साचलेले पाणी बाहेर काढण्यात आले.


नगरसेवकांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे भाविक व स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त करत त्यांचे आभार मानले.


Recent Comments