Belagavi

रामदेव हॉटेल नागदेवालय येथे नागपंचमीनिमित्त विशेष पूजा

Share

बेळगावमधील नेहरू नगर भागात असलेल्या प्रसिद्ध रामदेव हॉटेल परिसरातील नागदेवालय येथे नागपंचमी आणि श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवाराच्या निमित्ताने विशेष धार्मिक विधी संपन्न झाले.

श्रावण महिन्याची सुरुवात आणि नागपंचमीच्या शुभमुहूर्तावर नेहरू नगर येथील या नागदेवता मंदिरात वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. मालक रघुराम शेट्टी आणि त्यांचे कुटुंबीय परंपरेनुसार हा धार्मिक सोहळा अखंडितपणे पार पाडत आहेत. या भागात कुक्के सुब्रह्मण्यच्या धर्तीवर दर्शनाची व्यवस्था करण्यात आल्यामुळे बेळगाव आणि परिसरातील हजारो नागरिकांनी मंदिराला भेट दिली.

या प्रसंगी मंदिराचे मुख्य पुजारी गोपालकृष्ण शर्मा यांनी सांगितले की, नागपंचमी हा सण संस्कृती आणि श्रद्धेचा भाग असून वासुकी, शेष यांसारख्या प्रमुख नागदेवतेच्या आराधनेमुळे आरोग्य व समृद्धी लाभते, असे ते म्हणाले.

विशेष पूजेनंतर उपस्थित सर्व भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. आपण दरवर्षी याठिकाणी दर्शनासाठी येतो, शिवाय हे जागृत देवस्थान असल्याची भावना काही नागरिकांनी व्यक्त केली.

Tags: