hubali

कर्नाटक बंदविरोधात हुबळीत ऑटो चालकांचे आंदोलन

Share

तमिळनाडूला पाणी सोडण्याच्या विरोधात पुकारण्यात आलेल्या ‘कर्नाटक बंद’ला विरोध दर्शवत हुबळीत उत्तर कर्नाटक ऑटो रिक्षा चालक संघातर्फे तीव्र निदर्शने करण्यात आली. शहराच्या मध्यवर्ती भागातील कित्तूर चन्नम्मा चौकात एकत्र आलेल्या ऑटो चालकांनी “बंद नाही, हुबळी बंद नाही” अशा जोरदार घोषणा दिल्या.

कर्नाटक बंदला स्पष्ट विरोध दर्शवत उत्तर कर्नाटक ऑटो रिक्षा चालक संघाने हुबळीत नेहमीप्रमाणेच ऑटो वाहतूक सुरू राहील, असे जाहीर केले. आंदोलनादरम्यान ऑटो चालकांनी रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांना आणि नागरिकांना फुले देऊन “बंद नाही” असा संदेश दिला आणि कोणत्याही भीतीशिवाय आपले दैनंदिन व्यवहार सुरू ठेवण्याचे आवाहन केले.

या वेळी बोलताना उत्तर कर्नाटक ऑटो रिक्षा चालक संघाचे अध्यक्ष शेखरय्या मठपती यांनी, कावेरीसह राज्यातील पाण्याच्या प्रश्नावर सुरू असलेल्या लढ्याला आमचा नैतिक पाठिंबा आहे, मात्र बंदमुळे सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी आणि प्रवाशांची मोठी गैरसोय होते, म्हणूनच आम्ही बंदला विरोध करत असल्याचे स्पष्ट केले.

Tags: