Belagavi

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मूर्तिकारांसाठी ‘कला दृष्टी’ मोफत नेत्र तपासणी शिबीर

Share

श्री गणेशमूर्ती साकारणाऱ्या कलाकारांच्या डोळ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी ‘जंबगी सुपर स्पेशालिटी आय इन्स्टिट्यूट’ने ‘कला दृष्टी’ या उपक्रमांतर्गत थेट मूर्तिकारांच्या कार्यशाळांमध्ये जाऊन विशेष मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केले.

श्री गणेशमूर्तींचे डोळे आणि चेहऱ्यावरील भाव रेखाटताना मूर्तिकारांना तल्लख दृष्टिकोनाची नितांत गरज असते. मात्र मूर्ती घडवण्याच्या धावपळीत कलाकार स्वतःच्या डोळ्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. हीच बाब विचारात घेऊन ‘जंबगी सुपर स्पेशालिटी आय इन्स्टिट्यूट’च्या वैद्यकीय पथकाने थेट कलाकारांच्या कार्यशाळांमध्ये जाऊन नेत्र तपासणी केली, मोफत चष्म्यांचा सल्ला दिला तसेच योग्य वैद्यकीय मार्गदर्शन केले. जंबगी आय इन्स्टिट्यूटने राबवलेल्या या उपक्रमाचे शहरातील कलाकारांकडून विशेष कौतुक करण्यात आले.

Tags: