Belagavi

युवा समितीच्या वतीने खानापूर तालुक्यातील गर्लगुंजी आणि सिंगीनकोप मराठी प्राथमिक शाळांत शैक्षणिक साहित्याचे वितरण

Share

महाराष्ट्र एकीकरण युवा समिती आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने खानापूर तालुक्यातील गर्लगुंजी आणि सिंगीनकोप गावांतील मराठी प्राथमिक शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.

गर्लगुंजी येथे मराठी शाळेमध्ये कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद मा.ग्राम पंचायत सदस्य हणमंत मेलगे यांनी भूषविले.मराठी शाळा जगल्यावर मराठी भाषा टिकणार आहे. त्यामुळे सर्वांनी मिळून मराठी शाळा वाचविण्यासाठी कटिबद्ध राहिले पाहिजे असे
सामाजिक कार्यकर्ते तसेच मा.एस डी एम सी सदस्य संजय पाटील आणि मऱ्यापा पाखरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले.

यावेळी गर्लगुंजी येथे हणमंत मेलगे, मा. जि.पं. सदस्या लक्ष्मी पाटील, मार्केटिंग सोसायटी नंदगडचे गोपाळराव पाटील, पांडुरंग सावंत ता.पं.सदस्य, मा. SDMC सदस्य संजय पाटील, मऱ्यापा पाखरे , मा. ग्राम. पंचायत सदस्य संतोष पाटील, माउली सोसायटीचे सुनील पाटील, मा. ग्राम पंचायत सदस्य कृष्णा कुंभार, श्री शिवाजी कोलकार, सुरेश मेलगे, संतोष पाटील, गोकुल चौगुले यांनी युवा समितीच्या उपक्रमाचे व युवा कार्यकर्त्यांचे कौतुक केले. यावेळी कार्यक्रमावेळी गर्लगुंजी शाळेचे SDMC सदस्य आणि इतर शिक्षकवर्ग उपस्थित होता.

त्यानंतर सिंगीनकोप शाळेला भेट देण्यात आली.
गेल्या नऊ वर्षांपासून युवा समितीच्या माध्यमातून सीमाभागातील मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण केले जात आहे. मराठी शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे आणि मराठी शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी सकारात्मक वातावरण निर्माण करणे, हा उद्देश ठेवून हा उपक्रम राबविण्यात येतो. असे आदित्य कांबळे, शुभम कांबळे आणि श्री पाटिल यांनी सांगितले.
यावेळी विद्यार्थ्यांना अंकलिपी पुस्तिका, वह्या, पेन, पेन्सिल किट व इतर आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वितरण उपस्थितीतांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पत्रकार सुहास पाटील तसेच इतर शिक्षकवर्ग उपस्थित होता.
महाराष्ट्र एकीकरण युवा समिती खानापुरचे श्री पाटिल, शुभम कांबळे, आदित्य कांबळे, सुदेश घाडी,मुकेश गुरव, साईनाथ मळीक, कृष्णा खांबले , श्रीहरी पाटील, तुषार देसाई, तन्मय हुंदरे,श्रेयस निटूरकर आणि आकाश घाडी इ. कार्यकर्ते उपस्थित होते.

महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, खानापुर
महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगांव

Tags: