Chikkodi

अनैतिक संबंधाला अडसर ठरणाऱ्या पतीचा खून; पत्नीसह प्रियकर अटकेत

Share

अनैतिक संबंधाला अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीने प्रियकराच्या मदतीने खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. सुमारे सहा महिन्यांपूर्वी घडलेली ही घटना आता उघडकीस आली आहे.

बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील खडकलाट गावात ही घटना घडली असून, राघू गावडे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी मृत व्यक्तीची पत्नी बंगारी गावडे आणि तिचा प्रियकर रामा राणगे यांच्यावर आरोप आहे. राघू यांना शेतात बोलावून घेऊन प्रियकराच्या मदतीने त्यांची हत्या करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. हत्यानंतर पतीने मेंढ्या चरायला दुसऱ्या जिल्ह्यात गेल्याचा बनाव पत्नीने रचला होता.

राघू गावडे यांचे भाऊ लगमन्ना यांना संशय आल्याने त्यांनी चौकशी केली असता ही बाब उघड झाली. त्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. खडकलाट पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे. बेळगावचे पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून अनैतिक संबंधातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे.

Tags: