Bellary

मंत्री बी. नागेंद्र यांचे बळ्ळारीत आगमन

Share

मंत्रिपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच बळ्ळारीत आगमन झालेल्या मंत्री बी. नागेंद्र यांचे समर्थक आणि पक्ष कार्यकर्त्यांनी भव्य स्वागत केले.

बळ्ळारी शहरात आगमन होताच मंत्री बी. नागेंद्र यांनी कनकदुर्गम्मा मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले. मंत्रिपद भूषवल्यानंतर प्रथमच बळ्ळारी दौऱ्यावर आलेल्या मंत्री बी. नागेंद्र यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. कनकदुर्गम्मा मंदिराच्या आवारात एका कार्यकर्त्याने त्यांचा जंगी सत्कार केला. या प्रसंगी हजारो कार्यकर्ते आणि समर्थक उपस्थित होते.

Tags: