Belagavi

आमदार अभय पाटील यांनी घेतली संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट

Share

बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेऊन बेळगावचा विकास आणि स्थानिक तरुणांच्या रोजगाराबाबत महत्त्वाची चर्चा केली.

या वेळी त्यांनी बेळगावमधील संरक्षण विभागाची जागा कर्नाटक सरकारकडे हस्तांतरित करावी किंवा तिथे मोठा औद्योगिक प्रकल्प सुरू करावा, असे निवेदन दिले.

बेळगावात आयटी आणि सेमीकंडक्टर पार्क उभारण्यासाठी संरक्षण खात्याच्या ताब्यातील जमीन राज्य सरकारला परत करावी, अशी विनंती आमदार अभय पाटील यांनी संरक्षणमंत्र्यांकडे केली. जर जमीन हस्तांतरित करणे शक्य नसेल, तर स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी त्याच जागेवर केंद्र सरकारतर्फे ‘डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग युनिट’ स्थापन करावे, अशी मागणी त्यांनी लावून धरली. बेळगावच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तरुणांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण सदैव कटिबद्ध असल्याचे अभय पाटील यांनी या प्रसंगी सांगितले.

Tags: