बेळगाव येथील केएलएस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट एज्युकेशन अँड रिसर्च (आयएमईआर) संस्थेतर्फे ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी आयोजित १५ दिवसांचा ‘डिजिटल सक्षमीकरण’ प्रमाणपत्र कोर्स यशस्वीरीत्या पूर्ण झाला आहे.

दैनंदिन जीवनात आधुनिक तंत्रज्ञानाचा आत्मविश्वासाने वापर करता यावा, या उद्देशाने या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सहभागींना ऑनलाईन सुरक्षा, डिजिटल पेमेंट , सोशल मीडियाचा वापर, ऑनलाईन शासकीय सेवा मिळवणे आणि एआय तंत्रज्ञानाचा वापर याविषयी प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात आले.

संस्थेचे संचालक डॉ. आरिफ शेख यांच्या मार्गदर्शनाखाली अनुप्रिया कणबरकर यांनी हे प्रशिक्षण दिले. या कोर्सला नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला असून संस्था लवकरच पुढील बॅच सुरू करणार आहे. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी ०८३१-२४०५५११ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


Recent Comments