Chikkodi

मंत्री सतीश जारकिहोळींच्या उपमुख्यमंत्रीपदासाठी अजमेर दर्ग्यात विशेष प्रार्थना

Share

सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि अहिंद नेते मंत्री सतीश जारकीहोळी यांनी राज्याचे उपमुख्यमंत्रीपद भूषवावे, या इच्छेने राजस्थानमधील अजमेरच्या प्रसिद्ध ख्वाजा गरीब नवाज दर्ग्यात विशेष प्रार्थना करून चादर अर्पण करण्यात आली.

मंत्री सतीश जारकीहोळी यांचे समर्थक आणि सदलगा येथील रहिवासी अझरुद्दीन उस्मान शेखजी यांनी दर्ग्याला भेट देऊन ही विशेष प्रार्थना केली.

यावेळी बोलताना अझरुद्दीन शेखजी म्हणाले की, मंत्री सतीश जारकीहोळी हे प्रगल्भ राजकारणी आणि तरुणांचे आधारस्तंभ आहेत. राज्याचा विकास आणि सामाजिक सौहार्दासाठी ते सातत्याने कार्यरत असून आगामी काळात त्यांना उपमुख्यमंत्रीपदासारखी उच्च जबाबदारी मिळावी, यासाठी प्रार्थना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Tags: