चिकोडी तालुक्यातील शमनेवाडी येथील श्री ए.जी.एम. अभियांत्रिकी महाविद्यालयात गुरुपौर्णिमेनिमित्त विशेष कार्यक्रम श्रद्धा आणि भक्तिभावाने पार पडला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी राष्ट्रसंत आचार्य श्री १०८ गुणधरनंदी महाराज आणि स्वस्तिश्री धर्मसेन भट्टारक स्वामीजी यांच्या प्रतिमेचे पूजन करून धार्मिक विधींना सुरुवात करण्यात आली.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय अंकली यांनी गुरुपौर्णिमा हा केवळ उत्सव नसून जीवनाला योग्य दिशा देणाऱ्या गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असल्याचे सांगितले.
आचार्य श्री गुणधरनंदी महाराज यांनी आध्यात्मिक विचार, साधे जीवन आणि मूल्याधारित संदेशांच्या माध्यमातून समाजाला मार्गदर्शन केले असल्याचे त्यांनी नमूद केले. शमनेवाडी ते दिल्लीपर्यंत पदयात्रा करून त्यांनी समाजावर प्रभाव निर्माण केला असून, शिक्षणापासून वंचित राहिलेल्या परिस्थितीतून प्रेरणा घेत त्यांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कार्य केल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला डॉ. सचिन मेक्कळकी, डॉ. शशिकांत वाळके, के. आर. पाटील, अभिजित अकिवाटे, प्रशांत शेडबाळकर, अश्विनी फरलाद, स्नेहा वाळकी, वैश्णवी शेळके, अश्विनी मोनाचार्य, राणी सुटूरे, रवी वाळके, पिरगौडा हुळीकोप्पे, स्वयं शाम, काडेश कलादगी, माधुरी बोरगावे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.


Recent Comments