बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी (बीडीसीसी) बँकेतील रिक्त पदांची भरती पूर्णपणे पारदर्शक आणि गुणवत्तेच्या आधारावरच होणार असल्याचे अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले यांनी स्पष्ट केले आहे.

बँकेत सध्या रिकाम्या असलेल्या एकूण १०४ जागांच्या भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. यामध्ये द्वितीय श्रेणी लिपीक- ८३, शिपाई- २० आणि गनमॅन- ०१ या पदांचा समावेश आहे. भरती प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार होणार नसून उमेदवारांची निवड नियमानुसारच केली जाईल. त्यामुळे नोकरीचे आमिष दाखवणाऱ्या मध्यस्थ किंवा दलालांच्या जाळ्यात उमेदवारांनी व पालकांनी अडकू नये, असे आवाहन त्यांनी केले.

पात्र उमेदवारांना योग्य संधी देऊन बँकेची कार्यक्षमता वाढवणे हाच मुख्य उद्देश असल्याचे अण्णासाहेब जोल्ले यांनी म्हटले.


Recent Comments