Uncategorized

अन्नपूर्णवाडीत भटक्या कुत्र्यांचा त्रास; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Share

बेळगावच्या अन्नपूर्णवाडीत भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढल्याने शाळेत ये-जा करणारे विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आधार पब्लिक स्कूलचे संचालक आणि प्राचार्य मिलींद वैजनाथ बाचिकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

अन्नपूर्णवाडी परिसरात अलीकडच्या काळात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढल्याने नागरिकांसह शाळा प्रशासनालाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. याबाबत प्राचार्य मिलींद वैजनाथ बाचिकर यांनी जिल्हाधिकारी आणि अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचा, शिक्षकांचा तसेच पालकांच्या वाहनांचा भटक्या कुत्र्यांकडून पाठलाग केला जात असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले. त्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता असून संबंधित विभागाला तातडीने सूचना देऊन भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, तसेच विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

Tags: