जुने बेळगाव परिसरातील नागरिक आणि विद्यार्थी योग्य बस निवारा नसल्याने दररोज हैराण होत आहेत. यासंदर्भात स्थानिक प्रशासनाला निवेदन देऊन चार महिने उलटले तरी कोणतीही कारवाई न झाल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

सीबीटी भागातून जुने बेळगावसाठी बस सेवा उपलब्ध असली, तरी परतीच्या प्रवासासाठी योग्य बस स्थानक नाही. यामुळे नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना ऊन-पावसात रस्त्याच्या कडेला उभे राहून धोकादायकपणे बसची वाट पाहावी लागत आहे. या समस्येबाबत ‘पीएसआर मानवाधिकार संरक्षण परिषदे’चे बेळगाव शहर सोशल मीडिया अध्यक्ष पवन गाडीवड्डर यांनी चार महिन्यांपूर्वी अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते.

अद्याप प्रशासनाने कोणतीही पावले न उचलल्यामुळे पवन गाडीवड्डर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन सादर केले आहे. जुने बेळगाव भागात लवकरात लवकर बस निवारा न उभारल्यास शांततापूर्ण मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा प्रशासनाला देण्यात आला आहे.


Recent Comments