अमन नगर आणि डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम कॉलनीतील रस्ता, गटार आणि पिण्याच्या पाण्यासह विविध मूलभूत सुविधा कामांना बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला.


अमन नगर परिसरात एमजीएनवाय आणि मुख्यमंत्री विशेष निधीतून रस्ता व गटार विकासकामे हाती घेण्यात आली असून, आमदार आसिफ सेठ यांनी या कामांची पाहणी केली.


अमन नगरमधील मुख्य रस्ता तसेच अंतर्गत रस्त्यांसह दोन्ही बाजूंच्या गटार बांधकामासाठी सुमारे ७०० मीटर लांबीचे काम सुरू करण्यात आले आहे. या भागात दीर्घकाळापासून रस्त्यांची समस्या होती. त्यामुळे वृद्ध नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांना ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत होता. नागरिकांची समस्या लक्षात घेऊन एमजीएनवाय आणि मुख्यमंत्री विशेष निधीतून ही कामे सुरू करण्यात आली असून, ती लवकर पूर्ण केली जातील, असे आमदार आसिफ सेठ यांनी सांगितले.
यावेळी स्थानिक पदाधिकारी आणि रहिवाशांनी आमदार आसिफ सेठ तसेच अमान सेठ यांनी कॉलनीतील समस्या जाणून घेऊन तातडीने दखल घेतल्याबद्दल आभार व्यक्त केले. आगामी काळात प्रलंबित रस्ता दुरुस्ती आणि इतर मूलभूत सुविधांची कामेही पूर्ण करून नागरिकांच्या समस्या सोडवण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.


Recent Comments