बेळगावकरांसाठी दर्जेदार ड्रायफ्रूट्स, आरोग्यदायी स्नॅक्स आणि देश-विदेशातील प्रीमियम चॉकलेट्स उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने टिळकवाडीतील मंगळवार पेठ येथे ‘ऑल अबाउट नट्स’ या नव्या दालनाचा शुभारंभ करण्यात आला.


टिळकवाडीतील मंगळवार पेठ येथे सुरू झालेले ‘ऑल अबाउट नट्स’ हे आरोग्यदायी खाद्यपदार्थांच्या चाहत्यांसाठी एक नवे आकर्षण ठरत आहे. विविध मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या उद्घाटन सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राष्ट्रीय भाजपचे सरचिटणीस बी. एल. संतोष, माजी आमदार संजय पाटील, उत्तर मतदारसंघाचे आमदार अभय पाटील, माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ, माजी आमदार अनिल बेनके, भाजप जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, मुरगेंद्रगौड पाटील यांच्यासह अनेक मान्यवर आणि नागरिकांच्या उपस्थितीत या दालनाचे उद्घाटन करण्यात आले.


उद्घाटनप्रसंगी मान्यवरांनी दालनातील विविध विभागांची पाहणी केली. दर्जेदार खाद्यपदार्थ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.

‘ऑल अबाउट नट्स’मध्ये १०० हून अधिक प्रकारचे प्रीमियम ड्रायफ्रूट्स, आरोग्यदायी नमकीन, विविध प्रकारच्या सीड्स, खजूर, सुकामेवा, आकर्षक गिफ्ट पॅक्स तसेच देश-विदेशातून आयात करण्यात आलेली प्रीमियम चॉकलेट्स ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत.
दर्जेदारपणा, ताजेपणा आणि ग्राहकांना परवडणाऱ्या दरात उत्पादने उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हे दालन सुरू करण्यात आले आहे. आरोग्याबाबत जागरूक असलेल्या कुटुंबांसाठी ‘ऑल अबाउट नट्स’ हे एक उत्तम पर्याय ठरेल, अशी माहिती संस्थेच्या प्रतिनिधींनी दिली.
उद्घाटन सोहळ्याला व्यापारी, भाजपचे पदाधिकारी, मान्यवर आणि शेकडो नागरिक उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी नव्या दालनाला शुभेच्छा दिल्या.


Recent Comments