बेळगाव येथील कन्नड भवनात कन्नड साहित्य परिषद आणि कन्नड सांस्कृतिक भवन क्षेमाभिवृद्धी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्यिक पार्वती तुप्पदा यांच्या ‘श्री लीलामृत’ ग्रंथाचे लोकार्पण करण्यात आले.

कन्नड साहित्य परिषदेच्या जिल्हाध्यक्षा मंगला मेटगुड्ड यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला. कार्यक्रमप्रसंगी बोलताना, “लेखन करणे सोपे असले तरी त्याला पुस्तकाचे रूप देऊन मुद्रित करणे हे अत्यंत कठीण काम असते,” अशी प्रतिक्रिया साहित्यिक पार्वती तुप्पदा यांनी दिली.

हा ग्रंथ वाचकांमध्ये भक्तीभाव निर्माण करण्यासोबतच संपूर्ण कर्नाटक व भारतातील प्रख्यात पुण्यक्षेत्रांचा इतिहास आणि प्रवास मार्गदर्शक म्हणून अत्यंत उपयुक्त ठरेल, असा विश्वास कार्यक्रमाच्या अध्यक्षा मंगला मेटगुड्ड यांनी व्यक्त केला.
या वेळी ज्येष्ठ साहित्यिक य. रु. पाटील, सुभाष एणगी आणि ज्योती बदामी यांनी पुस्तकाबाबत आपले विचार मांडले. सोहळ्यात साहित्य परिषदेच्या वतीने लेखिका पार्वती तुप्पदा यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. हेमा सोनोल्ली यांनी स्वागत केले, एम. वाय. मेणसिनकाई यांनी परिचय करून दिला, शिवानंद तल्लूर यांनी सूत्रसंचालन केले तर वीरभद्र अंगडी यांनी आभार मानले.


Recent Comments