जैन कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगच्या एमबीए विभागातर्फे मच्छे कॅम्पस येथे २०२४-२०२६ बॅचच्या विद्यार्थ्यांसाठी आरोहण २०२६ निरोप सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.


एमबीए विभागप्रमुख डॉ. एस. रोहितराज यांनी स्वागत भाषणात विद्यार्थ्यांच्या समर्पणाचे कौतुक केले. अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ. जे. शिवकुमार यांनी नोकरी मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.


सोहळ्यात श्री गौरांग आणि मिलाग्रिन लोबो यांना शैक्षणिक कामगिरीबद्दल गौरविण्यात आले. तर शुभम कटगलकर यांना सर्वोत्कृष्ट विद्यार्थी तर सुझैन यांना सर्वोत्कृष्ट विद्यार्थिनी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

२०१० मध्ये सुरू झालेल्या या अभ्यासक्रमाच्या गेल्या सोळा वर्षांत १६ बॅच उत्तीर्ण झाल्या असून अनेक माजी विद्यार्थी जगभरात कार्यरत असल्याचे डॉ. रोहितराज यांनी स्पष्ट तसेच पालकांनी संस्थेच्या शिक्षणपद्धतीबद्दल समाधान व्यक्त करत शिक्षकांचे आभार मानले.
विद्यार्थी आणि पालकांच्या उपस्थितीत आयोजिण्यात आलेल्या या कार्यक्रमाची सांस्कृतिक कार्यक्रमाने सांगता झाली.


Recent Comments