बेळगाव येथील देवराज अर्स कॉलनीतील श्री नागनूर शिवबसवेश्वर ट्रस्ट वृद्धाश्रमाच्या आवारात सर्व लोक सेवा फाउंडेशनच्या वतीने पर्यावरण संवर्धनाचा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला.

सर्व लोक सेवा फाउंडेशनचे संस्थापक वीरेश बसय्या हिरेमठ आणि वृद्धाश्रमाचे पर्यवेक्षक एम. एस. चौगला यांच्या संयुक्त नेतृत्वाखाली हा वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला.दिवंगत चाणक्य नावलकर यांच्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा उपक्रम घेण्यात आला. त्यांच्या स्मरणार्थ वृद्धाश्रमाच्या परिसरात बेल, पिंपळ, वड आणि शमी यांसारखी पर्यावरणपूरक व धार्मिक महत्त्वाच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. फाउंडेशनने केवळ वृक्षारोपण न करता, ही झाडे मोठी होईपर्यंत त्यांच्या संगोपनाची संपूर्ण जबाबदारी घेतली आहे.

ज्येष्ठांच्या निधनानंतर त्यांच्या स्मृती जपण्यासाठी प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावून पर्यावरण वाचवावे, असे आवाहन फाउंडेशनचे संस्थापक वीरेश बसय्या हिरेमठ यांनी यावेळी केले.
याप्रसंगी चाणक्य नावलकर, लिंगय्या बुर्लीकट्टी, बापूसाब अत्तार, अल्लाबक्ष यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments