Uncategorized

बळ्ळारीत जेस्कॉमच्या हलगर्जीपणामुळे कंत्राटी कामगाराचा मृत्यू

Share

बळ्ळारी येथे जेस्कॉम अधिकारी आणि कामगार कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे एका २२ वर्षीय तरुण कंत्राटी कामगाराचा वीज खांबावरच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. वीज प्रवाह सुरू असतानाच खांबावर काम करावे लागल्याने या तरुणाला प्राणास मुकावे लागले.

बळ्ळारी जिल्ह्यातील संगनकल गावाजवळील ध्यान मंदिराजवळ जेस्कॉम विभागाचे कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात झाला. एर्रगुडी गावातील हुलगप्पा हा तरुण वीज लाईन दुरुस्त करण्यासाठी खांबावर चढला होता. वीज पुरवठा खंडित केल्याची खात्री (लाईन क्लिअरन्स) न घेताच अधिकाऱ्यांनी आणि कंत्राटदाराने त्याला खांबावर चढवले आणि अचानक वीज प्रवाह सुरू झाल्याने त्याचा मृत्यू झाला.

विद्युत धक्का बसल्यानंतर हुलगप्पा याने मदतीसाठी आकांत केला, मात्र वीज प्रवाह सुरू असल्याने स्थानिक सहकारी कामगार असहाय्य झाले होते. या गंभीर प्रसंगी जेस्कॉमचे कोणतेही अधिकारी किंवा लाईनमन उपस्थित नव्हते. या हृदयद्रावक घटनेप्रकरणी सध्या बळ्ळारी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Tags: