बेळगाव जिल्ह्यातील रायबाग परिसरात कार आणि दुचाकी दरम्यान झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातातील गंभीर जखमी असलेल्या दुसऱ्या प्रवाशाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

रायबाग शहराबाहेरील चिंचली मुख्य रस्त्यावर हा अपघात घडला. वेगाने येणाऱ्या कार आणि बाईकची समोरासमोर धडक झाली, ज्यामध्ये परमानंदवाडी गावचा रहिवासी संतोष राणा याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

धडकेमुळे दुचाकीवरील दुसरा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रायबाग पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या प्रकरणी रायबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.


Recent Comments