Accident

धारवाड येथील मुम्मिगट्टी राष्ट्रीय महामार्गावर दोन वाहनांची धडक; दोघांचा मृत्यू

Share

धारवाड येथील मुम्मिगट्टी राष्ट्रीय महामार्गावर गुड्स कंटेनर आणि टिप्पर यांच्यात झालेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

धारवाड जवळील मुम्मिगट्टी राष्ट्रीय महामार्गावर एका गुड्स कंटेनर आणि टिप्परमध्ये समोरासमोर धडक झाली. हा अपघात इतका तीव्र होता की, दोन्ही वाहनांच्या चालकांचा यात जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच गरगा पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

या अपघातामुळे राष्ट्रीय महामार्गावरील मुम्मिगट्टी परिसरात काही काळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या आणि वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला होता. पोलिसांनी घटनास्थळावरून अपघातग्रस्त वाहने बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. तसेच दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. मृत व्यक्तींची ओळख पटवण्याचे काम सुरू असून, या प्रकरणी गरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags: