hubbali

आम. प्रसाद अब्बय्या यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याची हुबळीत मागणी

Share

आमदार प्रसाद अब्बय्या यांना मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या मंत्रिमंडळात मंत्रिपद देण्यात यावे, या मागणीसाठी हुबळी तालुका शेतकरी संघटनेच्या वतीने शहरात तीव्र निदर्शने करण्यात आली.

तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करत आंदोलनकर्त्यांनी आपली भूमिका मांडली. आमदार प्रसाद अब्बय्या हे पूर्व मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले असून त्यांनी गरिबांसाठी घरे बांधण्यासह अनेक विकासकामे केली आहेत. त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिल्यास ते आणखी चांगल्या पद्धतीने विकासकामे करू शकतील, त्यामुळे अब्बय्या यांना मंत्रिपद मिळालेच पाहिजे, अशी मागणी आंदोलकांनी केली.

या आंदोलनात हुबळी तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सिद्धप्पा मीसे, उपाध्यक्ष फकीरगौडा पाटील, शेतकरी नेते अडिवप्पा नंदीहळ्ळी, गुरसिद्धाप्पा कटगी, चन्नबसप्पा असुंडी, मोहन असुंडी, वीरभद्रप्पा मेटी आणि गंगाधर असुंडी यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: