खानापूर तालुक्यातील नांदगड येथील गुणवंत विद्यार्थिनी आफिया वाहीद सकली हिने एसएसएलसी परीक्षेत ९५.२० टक्के गुण मिळवून यश संपादन केले आहे. या यशाबद्दल पंच हमी योजना अंमलबजावणी प्राधिकरणाचे सदस्य बाबू हत्तरवाड यांच्या नेतृत्वाखाली आफियाच्या घरी जाऊन तिचा सत्कार करण्यात आला.
आपल्या सामाजिक कार्यामुळे खानपूर तालुक्यात परिचयीत असलेले प्राधिकरणाचे सदस्य बाबू हत्तरवाड यांनी ग्रामीण भागातील आफियाच्या या यशाचे कौतुक केले. विद्यार्थिनीला प्रोत्साहन देण्यासाठी तिचा शाल परिधान करून सत्कार करण्यात आला आणि पुढील उच्च शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी नांदगड ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष महम्मद शफी काझी, प्रमुख कार्यकर्ते महेश मादार, रमेश खनगांवी, किरण तेगोर यांच्यासह गावातील मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी विद्यार्थिनीच्या या यशाबद्दल आनंद व्यक्त केला.



Recent Comments