hubbali

हुबळीत मोबाईल न दिल्यामुळे गवंड्याकडून कंत्राटदाराची भीषण हत्या

Share

कामाच्या मजुरीऐवजी नवीन मोबाईल घेऊन देण्यास नकार दिल्याने एका गवंड्याने आपल्याच कंत्राटदाराची (मेस्त्री) लोखंडी रॉडने मारहाण करून हत्या केली. हुबळी तालुक्यातील रेवडीहाळ गावाच्या शिवारात ही खळबळजनक घटना घडली आहे.

दादापीर कोलकार (वय ३८, रा. चब्बी, ता. हुबळी) असे खून झालेल्या कंत्राटदाराचे नाव आहे. या प्रकरणी त्याचा कामगार अझीम जमखाने याच्यावर हत्येचा आरोप आहे. दादापीर यांच्याकडे अझीम हा गवंडी कामगार म्हणून काम करत होता.

अझीमने मजुरीच्या पैशांऐवजी नवीन मोबाईलची मागणी केली होती. मात्र, दादापीर यांनी जुन्या पैशांचे कारण देत आणि कामावर नीट येत नसल्याचे सांगत मोबाईल देण्यास नकार दिला होता. या नकाराने संतप्त झालेल्या अझीमने दादापीर यांच्यावर लोखंडी रॉडने बेदम हल्ला केला, ज्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला.

हुबळी ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Tags: