महिला सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारने लागू केलेला ‘नारी शक्ती वंदन’ कायदा भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल, असे आमदार शशिकला जोल्ले यांनी म्हटले आहे.


बेळगावमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत आमदार शशिकला जोल्ले यांनी केंद्र सरकारच्या ‘नारी शक्ती वंदन’ कायद्याचे स्वागत करत हा निर्णय ऐतिहासिक असल्याचे म्हटले आहे. स्वतंत्र भारतात महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळाल्याने देशाच्या सर्वांगीण विकासात महिलांचा सहभाग वाढणार असून, स्थानिक समस्या थेट लोकसभेपर्यंत पोहोचवण्यासाठी ही मोठी संधी असल्याचे त्यांनी नमूद केले.
ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत महिलांना सत्तेत वाटा मिळाल्यास विकसित भारताची संकल्पना खऱ्या अर्थाने पूर्ण होईल आणि महिलांवरील अत्याचाराविरोधात आवाज उठवण्यासाठी हे आरक्षण पूरक ठरेल, असे प्रतिपादन शशिकला जोल्ले यांनी केले. या कायद्यामुळे २०२८ च्या निवडणुकीत एकट्या बेळगाव जिल्ह्यातून ६ महिला विधानसभेत प्रवेश करतील, तसेच ‘एक देश एक निवडणूक’ प्रक्रियेतही याची मोठी मदत होईल आणि अंतर्गत आरक्षणाबाबतचे गोंधळ पंतप्रधान विशेष अधिवेशनात सोडवतील, अशी खात्री शशिकला जोल्ले यांनी व्यक्त केली.
यावेळी भाजप शहराध्यक्षा गीता सुतार, उज्वला बडवण्णाचे, शिल्पा केक्रे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होत्या.


Recent Comments