बेळगाव जिल्ह्यातील काकती गावातील एका छोट्या घरामध्ये सध्या आनंदाचे वातावरण आहे. थोर मोठ्यांचे आशीर्वाद आणि कठोर परिश्रम असल्यास यश संपादन करणे कठीण नाही, हे या तरुणाने बारावीच्या परीक्षेत मिळवलेल्या यशाने सिद्ध केले आहे.

बेळगाव तालुक्यातील काಕती येथील राणी चन्नम्मा गल्लीतील रहिवासी असलेल्या शिवसागर अशोक हालण्णवर याने २०२५-२६ शैक्षणिक वर्षाच्या बारावी विज्ञान शाखेच्या निकालात घवघवीत यश संपादन केले आहे. ६०० पैकी ५९६ गुण मिळवत त्याने ९९.३३ टक्के गुणांसह आपल्या कॉलेजमध्ये प्रथम आणि राज्यात तिसरा क्रमांक पटकावून जिल्ह्याचा गौरव वाढवला आहे.
वडिल अशोक सिद्धप्पा हालण्णवर आणि आई गायत्री यांच्या प्रोत्साहनामुळे हा टप्पा गाठल्याचे शिवसागरने सांगितले. भविष्यात एमबीबीएस पूर्ण करून वैद्यकीय क्षेत्रात सेवा देण्याचे स्वप्न शिवसागर अशोक हालण्णवर याने व्यक्त केले आहे.


Recent Comments