बेळगावमधील कारंजीमठ येथे मासिक शिवानुभव गोष्ठी आणि अक्क महादेवी जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


यावेळी प्रेमक्का अंगडी बोलताना म्हणाल्या, आजच्या धावपळीच्या युगात भौतिक सुखाच्या हव्यासापोटी माणूस मानवी मूल्ये विसरत चालला असून, अक्क महादेवींच्या वचनांचा अभ्यास ही काळाची गरज आहे. अक्क महादेवींची वचने आत्मज्ञान आणि शुद्ध भक्तीचा मार्ग दाखवतात, ज्यामुळे जीवनात शांती आणि आध्यात्मिक जाणीव निर्माण होते, अशी प्रतिक्रिया प्रेमक्का अंगडी यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाचे दिव्य सान्निध्य पूज्य श्री गुरुसिद्ध महास्वामीजी यांनी भूषवले, तर रत्नप्रभा बेल्लद यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षपद सांभाळले. कुमारेश्वर संगीत पाठशाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या भक्तिपूर्ण वचनांनी उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए. के. पाटील यांनी केले, तर व्ही. के. पाटील यांनी आभार मानले. या सोहळ्याला बेळगावमधील अनेक भक्त आणि साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments