Belagavi

संस्कृती जोपासण्यात महिलांचे योगदान अनन्यसाधारण: राजश्री जैनापुरे

Share

भारतीय संस्कृती आणि अध्यात्माचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याची मुख्य जबाबदारी महिलांवर असून, मातांनी आपल्या पाल्यांवर सुसंस्कार करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन अधिकारी राजश्री जैनापुरे यांनी केले आहे.

बेळगावातील मिनी मिलेनियम गार्डनमध्ये श्री भुवनेश्वरी उत्सव समिती आणि कन्नड महिला संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चैत्रोत्सव २०२६’ चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्य अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या राजश्री जैनापुरे यांनी तरुण पिढी श्लोक, वचने आणि अध्यात्मापासून दूर जात असल्याबद्दल खंत व्यक्त केली.

मानसोपचार तज्ज्ञ डॉ. सरस्वती तेनगी यांनी महिलांची मानसिक स्थिती आणि सामाजिक आव्हाने यावर प्रकाश टाकला. तर श्री भुवनेश्वरी उत्सव समितीच्या अध्यक्षा रंजना नायक आणि कन्नड महिला संघाच्या अध्यक्षा माहेश्वरी गाळी यांनी कार्यक्रमाचे नेतृत्व करत सांस्कृतिक उपक्रमांचे महत्त्व विशद केले.

याप्रसंगी भारती वडवी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. महिला संघटनांच्या माध्यमातून राबवण्यात येत असलेल्या या विधायक कामांचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.

चैत्रोत्सवाच्या माध्यमातून महिलांना संघटित करून संस्कृती रक्षणाचा संकल्प करण्यात आला. आगामी काळात अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून युवा पिढीला आपल्या मुळांशी जोडण्याचे काम केले जाईल, अशी प्रतिक्रिया रंजना नायक आणि माहेश्वरी गाळी यांनी व्यक्त केली.

Tags: