बेळगावमधील हिरेबागेवाडी पोलीस ठाण्याच्या पथकाने कुकडोळ्ळी गावात मटका जुगारावर धाड टाकून एका व्यक्तीला अटक केली आहे.
कुकडोळ्ळी येथे जुगार खेळणाऱ्या होन्नप्पा बसप्पा कोलकार (४५, रा. बसवनगर, दारिशवाड, बेळगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. हिरेबागेवाडी पोलीस ठाण्याचे पीएसआय अविनाश ए. व्ही. आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या पथकाने या ठिकाणी छापा टाकला.
या कारवाईत पोलिसांनी आरोपीकडून रोख रक्कम आणि मटक्यासाठी वापरले जाणारे साहित्य हस्तगत केले आहे. आरोपीविरुद्ध हिरेबागेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.
या यशस्वी कारवाईबद्दल बेळगाव शहराचे पोलीस आयुक्त आणि डीसीपी यांनी पीएसआय अविनाश ए. व्ही. व त्यांच्या पथकाचे अभिनंदन केले आहे.


Recent Comments