गोकाक रस्त्यावरील मुगळीहाळ क्रॉस जवळ शनिवारी एका भरधाव टिप्परने पादचाऱ्याला धडक दिली. या भीषण अपघातात २९ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून पोलिसांनी टिप्पर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
इन्नाळ-सत्तिगेरी रस्त्यावरील मुगळीहाळ क्रॉस जवळ शनिवारी हा अपघात झाला. कौजलगी गावातील रहिवासी उमेश भजंत्री हे सत्तिगेरी बसस्थानकाच्या दिशेने पायी जात असताना नागप्पा हंजी चालवत असलेल्या भरधाव टिप्परने त्यांना धडक दिली. टिप्परचा वेग जास्त असल्याने उमेश भजंत्री यांचा जागीच मृत्यू झाला.
चालकाचा अतिवेग आणि निष्काळजीपणा या अपघाताला कारणीभूत असल्याचे समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच मुरगोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन जप्त केले असून चालक नागप्पा हंजी याला ताब्यात घेतले आहे.


Recent Comments