Accident

हिरेबागेवाडीनजीक राष्ट्रीय महामार्गावर दोन ट्रकची भीषण धडक; चालकाचा जागीच मृत्यू

Share

बेळगावमधील हिरेबागेवाडीजवळ दोन ट्रकचा भीषण अपघात होऊन एका चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. केमिकल सिमेंट आणि कांदा वाहून नेणाऱ्या ट्रकची धडक इतकी भीषण होती की, यात एका ट्रकचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.

बेळगाव जिल्ह्यातील हिरेबागेवाडी गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावर मध्यरात्री हा थरार घडला. केमिकल सिमेंटने भरलेला ट्रक आणि कांद्याची वाहतूक करणारा ट्रक यांच्यात जोरदार धडक झाली. या अपघातात केमिकल सिमेंट वाहून नेणाऱ्या ट्रकच्या चालकाचा जागीच मृत्यू झाला.

धडक इतकी जोरदार होती की, कांद्याच्या ट्रक मधील सुमारे ८४२ पोती कांदा महामार्गावर विखुरला गेला. यामुळे लाखो रुपयांचा कांदा रस्त्यावर पसरून मातीमोल झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच हिरेबागेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.

याप्रकरणी हिरेबागेवाडी पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Tags: